शेतकरी योजना

शेतमाल तारण कर्ज योजना

शेतमाल तारण योजना ही श्रीरामपूर बाजार समिती गेल्या १० वषांपासून राबवित आहे. त्यासाठीचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात श्रीरामपूर बाजार समितीस नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळालेले आहे. शेतमालाचे बाजारभाव कमी झाल्यास शेतकऱ्यांना आपला माल साठविता यावा व जेव्हा बाजारभाव वाढतील त्यावेळी तो विक्री करता यावा यासाठी ही योजना राबविण्यात येते. शेतकऱ्यांना शेतीमालाच्या तारणावर बाजार समिती ६ टक्के व्याज दराने सहा महिन्यांकरीता कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आतापयंत अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. शेतकरी यांना अंत्यंत कमी कागदोपत्री, कमी वेळेत व अल्प व्याज दर शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते.