श्रीरामपूर मुख्य आवरामध्ये भुसार मार्केट असून तालुक्यातील शेतकरी आपला शेतमाल श्रीरामपूर येथील भुसार मार्केट मध्ये विक्रीसाठी आणतात. जनरल कमिशन एजंट (आडतदार)यांना शेतमाल खरेदी विक्री करीता सेलहॉल दिलेले आहेत.
श्रीरामपूर मुख्य आवरामध्ये गोणी व मोकळा कांदा मार्केट असून तालुक्यातील शेतकरी आपला कांदा शेतमाल श्रीरामपूर येथील कांदा मार्केट मध्ये विक्रीसाठी आणतात. जनरल कमिशन एजंट (आडतदार)यांना शेतमाल खरेदी विक्री करीता सेलहॉल दिलेले आहेत. तसेच सोमवार, बुधवार व शुक्रवार हया दिवशी गोणी मार्केट असते व सोमवार ते शुक्रवार मोकळा कांदा माकेट असते.
श्रीरामपूर मुख्य आवरामध्ये भाजीपाला मार्केट असून तालुक्यातील शेतकरी आपला भाजीपाला शेतमाल श्रीरामपूर येथील भाजीपाला मार्केट मध्ये विक्रीसाठी आणतात. जनरल कमिशन एजंट (आडतदार)यांना शेतमाल खरेदी विक्री करीता सेलहॉल दिलेले आहेत. भाजीपाला मार्केट सकाळी ५ वाजलेपासून लिलाव सुरू होतात.
श्रीरामपूर बाजार समितीस हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपनीची डिलरशीप मिळाली आहे. बाजार समितीने पेट्रोल पंपाकरीता ३० गुंठे जागा एच.पी.सी.एल.कंपनीला कराराने दिली असुन सदर जागेचे भाडे हे दरमहा ८०,०००/- रू. बाजार समितीस मिळत आहे. तसेच पेट्रोल पंप चालविण्याची एजन्सी मिळाल्याने पेट्रोल व डिझेल विक्री बाजार समिती स्वतः पेट्रोल पंप चालवित आहे. पेट्रोल पंप चालु करण्याकरीता बाजार समितीने जनरेटर, नविन डी.पी.उभारणी,अग्निशामक यंत्रणा, एअर कॉम्प्रेसर,हवा चेक करण्याचे स्वयंचलित मशीन,तिजोरी इत्यादी वस्तुंची खरेदी केलेली आहे.
