Press Note

  • CCI cotton procurement begins at Mahankalwadgaon; Big relief to farmers due to sophisticated system

अहमदनगर जिल्ह्यातील महांकाळवाडगाव येथील प्रगतशील उद्योजक चांगदेव पवार यांच्या व श्रीरामपूर मार्केट कमिटी यांच्या अथक प्रयत्नाने भारतीय कपास निगमने म्हणजेच सीसीआय ने कापुस खरेदी सुरू केली आहे. अत्यंत अत्याधुनिक पध्दतीने श्री संत गंगागिरी अॅगरो इंडस्ट्रीज च्या आवारात ही खरेदी अत्यंत नियमबद्ध पध्दतीने सुरू आहे. सॅटेलाईट व ऑनलाईन पध्दतीने सीसीआय च्या ग्रेड नियमावली नुसार ही खरेदी सुरू असुन उच्च दर्जाचा कापुस येथे खरेदी केला जात आहे. सदर कापुस खरेदी केंद्रांस आमच्या टीम ने भेट दिली असता. अत्याधुनिक पध्दतीने ही खरेदी म्हणजे शेतकर्यांना उत्तम भाव उत्तम संधी असल्याचे निदर्शनास आले. संत गंगागिरी अॅगरो इंडस्ट्रीज चे चांगदेव पवार यांच्या उत्तम व्यवस्थापनाचा व अत्याधुनिक जिनींग मिल मुळे हे तालुक्याला मिळालेले केंद्र म्हणजे उत्तर नगर जिल्ह्य़ातील शेतकर्यांची साठी मिळालेली उत्तम संधीच म्हणावी लागेल.

सीसीआय च्या या खरेदी केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे कुठल्याही प्रकारचा भावा बददलचा वजना बद्दलचा घोटाळा अशक्य असल्याचे दिसून आले. या वर्षी अति वृष्टी मुळे कापुस गुणवत्ता खालावल्याने कमी कापूस खरेदी होतांना दिसत आहे.